Saturday, 22 February 2020

Kurneshwar Temple

Entry of kurneshwar
Kurneshwar Temple
   ऐतिहासिक सातारा शहराच्या दक्षिण बाजूला सज्जनगड रस्त्याने गेलात, की डाव्या बाजूला निवांत निसर्ग सान्निध्यात वसलेलं देवस्थान दिसतं. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला खिंडीतील गणपती आणि कुरणेश्वर देवस्थान यांनी भक्तांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 
  केवळ सातारकरच नव्हे तर परप्रांतामधून आलेल्या भाविक आणि पर्यटकांचं हे मोठं श्रद्धास्थान आहे. देवदर्शनाबरोबर निसर्गरम्य पर्यटनाची मेजवानी ठरणारं हे ठिकाण अजिंक्यतारा किल्ल्याच्या कुशीत सातारा शहरापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर आहे. 
  या देवस्थानला पायी जाणा-यांची संख्या आधिक आहे. परिसरात गणपतीबरोबरच कुरणेश्वर महादेव मंदिर आणि दत्त मंदिरही आहे.अजिंक्यतारा किल्ल्याला वेढा पडल्यावर देवभक्तांनी मुसलमानांकडून मूर्ती फोडली जाऊ नये म्हणून पूर्वीच्या देवालयाच्या प्रवेशद्वारात नवी मूर्ती बसवल्याचं सांगितलं जातं. ही मूर्ती तिचं स्वरूप लक्षात घेता दगडाची नसावी असं वाटतं.
  निसर्गरम्य आणि घनदाट झाडीने बहरलेला हा परिसर गणेशभक्तांबरोबरच पर्यटकांचंही आकर्षण ठरला आहे.
  श्री गणेश मंदिराच्या पूवेर्स दगडी पाय-या उतरून गेल्यावर स्वयंभू महादेवाचं कुरणेश्वर मंदिर असून हा निवांत आणि रमणीय परिसर पर्यटकांसाठी वर्षभर खुणावत असतो.
शिवा मंदीर


No comments:

Post a Comment

Kurneshwar Temple

Kurneshwar Temple     ऐतिहासिक सातारा शहराच्या दक्षिण बाजूला सज्जनगड रस्त्याने गेलात, की डाव्या बाजूला निवांत निसर्ग सान्निध्यात वसले...